प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोल्हापुरातील बांबवडे येथे ब्रेक निकामी झाल्याने बेळगावहून रत्नागिरीकडे येणाऱया एसटी बसला अपघात झाल़ा यावेळी नियंत्रण सुटलेल्या बसने मार्गावरील 2 वाहनांना धडक दिल़ी चालकाने यावेळी प्रसंगावधान दाखवत बस थांबवण्यात यश मिळवल्याने बसमधील 45 प्रवासी बालंबाल बचावल़े तर अपघातात दोन वाहनांचे नुकसान झाले असले तरी कुणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी सकाळी बेळगाव येथून प्रवाशांना घेऊन हुबळी-कोल्हापूर-रत्नागिरी बस निघाली होत़ी दुपारी 3 च्या सुमारास बस कोल्हापुरातील बांबवडे येथे आली असता बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याबाबत चालकाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केल़ा तसेच चालकाने समोरुन येणाऱया वाहनांनाही ब्रेकफेल झालेत.. बाजूला व्हा, असे ओरडून सांगत होता. यावेळी अचानक बसमध्ये झालेल्या बिघाडामुळे बसमधील प्रवाशांचा जीव टांगणीला लागल़ा
चालकाचे नियंत्रण सुटलेल्या या बसने बांबवडे येथे समोरील कारला मागून धडक दिल़ी कारला धडक दिल्यानंतरही बसचा वेग कमी झाला नाह़ी यावेळी बसने पुढे ऊस घेऊन जाणाऱया ट्रक्टरला धडक दिली. यानंतर बसचा वेग कमी झाल्याने अखेर चालकाला बस थांबवण्यात यश आल़े चालकाने आरडाओरडा करत वाहनांना वेळीच बाजूला होण्याचा इशारा केल्याने या घटनेत मोठी दुर्घटना रोखण्यात चालकाला यश आल़े तसेच बसमधील सर्व 45 प्रवासी सुखरूप बाहेर आल़े