ब्रिटनमध्ये भारतीयांच्या मालकीच्या कंपन्यांचा एकत्रित महसूल 36.84 अरब पौंड असून, या कंपन्यांनी 1,74,000 लोकांना रोजगार दिला आहे. ब्रिटनमधील प्रवासी भारतीयांच्या योगदानाबद्दल पहिल्यांदाच एक संशोधन अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार या कंपन्या सुमारे एक अरब पौंड कंपनी कर देतात. मंगळवारी जारी केलेल्या ‘ब्रिटनमध्ये भारत : प्रवासी प्रभाव’ या अहवालात 654 प्रवासी भारतीयांच्या मालकीच्या कंपन्यांच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले आहे. यातील कंपन्यांचा व्यवसाय कमीत कमी एक लाख पौंड इतका आहे.
अहवालानुसार, या कंपन्यांनी एकत्रितपणे ब्रिटनमध्ये दोन अरब पौंड भांडवल गुंतविले आहे. हा अहवाल ग्रान्ट थॉर्नटन ब्रिटनने एकत्रितरित्या लंडनमध्ये भारतीय उच्चायोग आणि फिक्की, यूकेसह मिळून तयार केला आहे. यामध्ये विदेशीयांशी संबंधित 65 हजार कंपन्यांपैकी निवडक कंपन्यांचे विश्लेषण केले आहे.