भारतीय नौदलाकडून पार पडले परीक्षण : लक्ष्याचा अचूक भेद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताला मंगळवारी मोठे यश प्राप्त झाले आहे. भारतीय नौदलाने सुपरसोनिक ब्ा्रह्मोस क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. पश्चिम किनाऱयावर तैनात आयएनएस विशाखापट्टणम या युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे.
हे क्षेपणास्त्र समुद्रातून समुद्रात मारा करणारे होते. कमाल मारक पल्ला आणि अचूकतेसह लक्ष्यावर क्षेपणास्त्राने हल्ला केल्याचे भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले. ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे.
या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला अलिकडेच 298 किलोमीटरवरून वाढत 450 किलोमीटर करण्यात आला आहे. कमी पल्ल्याची हे रॅमजेट, सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र स्वतःच्या शेणीतील सर्वात वेगवान क्षेपणास्त्र आहे. पाणबुडी, युद्धनौका, विमान किंवा जमिनीवरूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. रशियाच्या पी-800 ओंकिस क्रूज क्षेपणास्त्राच्या तंत्रज्ञानावर आधारित हे क्षेपणास्त्र आहे. भारतीय सैन्य, वायुदल आणि नौदलाला या क्षेपणास्त्राचा पुरवठा करण्यात आला आहे.
ब्राह्मोसची वैशिष्टय़े…
ब्राह्मोस क्षेपणास्त्र देशातच विकसित करण्यात आले.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र रशिया आणि भारताचा संयुक्त प्रकल्प
यात ब्राहचा अर्थ ‘ब्रह्मपुत्रा’ आणि एमओएसचा अर्थ ‘मोस्कवा’
21 व्या शतकातील सर्वात धोकादायक क्षेपणास्त्रांमध्ये गणना
रॅमजेट इंजिनचा अंतर्भाव, अचूकता तसेच अधिक घातक क्षमता
4300 किलोमीटर प्रतितासाच्या कमाल वेगासह झेपावू शकते
शत्रूच्या रडारला चकवा देण्याची क्षेपणास्त्रांमध्ये क्षमता
मिग-29 अन् तेजस तसेच राफेलमध्ये तैनात करण्याची योजना
‘प्रलय’चे यशस्वी परीक्षण
यापूर्वी डीआरडीओने कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘प्रलय’चे यशस्वी परीक्षण पेले होते. डीआरडीओने 22 अन् 23 डिसेंबर रोजी हे परीक्षण केले होते. ओडिशाच्या किनाऱयावरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते.









