ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये आतापर्यंत 24 लाख 84 हजार 649 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 17 लाख 21 हजार 560 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
ब्राझीलमध्ये मंगळवारी 41 हजार 169 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 955 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ब्राझीलमध्ये 6 लाख 74 हजार 455 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8 हजार 318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 88 हजार 634 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 26 लाख 01 हजार 96 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 44 लाख 98 हजार 343 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर भारतात ही संख्या 15 लाख 35 हजार 335 एवढी आहे.









