प्रतिनिधी / मडगाव
तारीभाट, बोरी, फोंडा येथील श्री रामपुरुष कामाक्षी संस्थानचा वर्धापनदिन 5 रोजी साजरा झाला. देवस्थानचा दिवजोत्सव आज 11 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी व शिरोडा येथे जत्रोत्सव 14 रोजी होणार आहे. आज 11 रोजी संध्याकाळी 4 वा. वनवरा व 5 वा. दिवजोत्सव होणार आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उत्सवाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तरी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.









