कोगनोळी चेकपोस्टवर सेवा बजावलेल्या हासनमधील पाच पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी तपास नाक्मयावर सेवा बजावलेल्या हासन जिह्यातील पाच पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी त्यांचे अहवाल आले असून त्यामुळे तपास नाक्मयावर सेवा बजावलेल्या महसुल, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱयांचे धाबे दणाणले आहेत.
महाराष्ट्रातून येणारे लोंढे कोगनोळी तपास नाक्मयावर अडवून त्यांची माहिती घेण्यासाठी व ई-पासच्यामाध्यमातुन त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत करण्यासाठी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर रोज आळीपाळीने 200 हून अधिक अधिकारी व कर्मचारी काम करतात.
बेळगाव शहरातूनही एक पोलीस उपनिरीक्षक व 8 पोलीस कोगनोळी तपास नाक्मयावर तैनात करण्यात आले होते. केवळ बेळगाव शहरच नव्हे तर सर्वच जिह्यातून प्रत्येकी 9 जणांना या तपास नाक्मयावर तैनात करण्यात आले आहे. तपास नाक्मयावर कोणत्या जिह्याचे लोक येतात त्या जिह्याचे पोलीस त्यांच्याशी संवाद साधून पुढील प्रक्रिया पूर्ण करतात, अशी तेथील व्यवस्था आहे.
या व्यवस्थेप्रमाणे सेवा बजावण्यासाठी कोगनोळी तपास नाक्मयावर आलेल्या 9 पैकी पाच पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे तपास नाक्मयावर सेवा बजावणाऱया अधिकारी कर्मचाऱयांना धक्का बसला आहे. आतापर्यंत बेंगळूर शहर, मंगळूर, उडपी, हासन, बागलकोट येथील 20 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
बेंगळूर, मंगळूर येथे तर ज्या पोलीस स्थानकात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कर्नाटकातील 200 पोलिसांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेने ही संख्या कमी असली तरी कर्नाटकातही पोलिसांना कोरोनाची बाधा होवू लागली आहे.
महाराष्ट्रात 1800 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशिक्षणाचा अभाव, संरक्षण साहित्याचा तुटवडा, योग्य खबरदारी न घेणे आदी प्रकारांमुळे पोलीसांना कोरोनाची लागण होत आहे. तपास नाक्मयावर येणाऱया प्रवाशांची तपासणी करण्याबरोबरच क्वारंटाईन केंद्रांवर पहारा देण्याचे कामही पोलीस करतात. यापैकी कोठेही ते रुग्णांच्या संपर्कात येवू शकतात.
कोगनोळी तपास नाक्मयावर अत्यंत व्यवस्थीतपणे व नियोजनबध्दरित्या काम सुरु आहे. महाराष्ट्रासह देशभरातून विविध राज्यांतून येणाऱया प्रवाशांना अडवून त्यांची माहिती घेतली जात आहे. ज्यांनी ज्यांनी ई-पास मिळवून कर्नाटकात आले आहेत त्यांना त्यांच्या जिह्यात पोहोचविण्याचे काम पोलीस करीत आहेत. अशा कर्तव्यातूनच ते रुग्णांच्या संपर्कात येण्याचा धोका अधिक आहे.
तपास नाक्यावर खास करुन कागदपत्रांची पडताळणी करावी लागते. आधारकार्डसह इतर कागदपत्रे हातानेच धरुन हाताळावे लागतात. यातूनही पोलिसांना संसर्ग होवू शकतो. बेंगळूर येथे तर चोरांना पकडलेल्या पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. कारण पोलिसांनी ज्याला पडकले होते तो चोर कोरोनाग्रस्त होता.
कोरोना रुग्ण आढळून आलेल्या मंगळूर जिह्यात पोलिसांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना हात धुण्यासाठी पोलीस स्थानकाबाहेर बेसीनची व्यवस्था करण्यात आली आहे. सॅनिटायझर, चेहरा झाकण्यासाठी वायझर पुरविण्यात आला आहे. मात्र ही सुविधा बेळगाव शहर व जिह्यात पुरविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांना आहेत त्या परिस्थिती काम करावे लागत आहे.
पोलिसांचीही होणार तपासणी
कोगनोळी चेकपोस्टमुळे निपाणी पोलीस गेल्या दोन महिन्यांपासून दिवसरात्र कामात आहेत. याबरोबरच महामार्गावर राज्यातील सर्व जिह्यातून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्या त्या जिह्यातील नागरिकांच्या अनुकुलतेसाठी सरकारने हा उपक्रम राबविला आहे. मात्र आता पोलिसांना कोरोनाचा धोका वाढला आहे. यासाठी तरुण भारतने जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याशी संपर्क साधला असता हासनमधून आलेल्या पाच पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोगनोळी तपास नाक्मयावरच त्यांना लागण झाली आहे हे सांगता येत नाही. तरीही राज्य पोलीस महासंचालकांच्याआदेशावरुन जिह्यातील सर्व पोलिसांची तपासणी करण्यात येणार आहे. खास करुन कोरोना रुग्ण आढळून आलेल्या गावात सेवा बजावणारे, तपास नाक्मयावर सेवा बजाविणाऱया पोलिसांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत 70 पोलिसांची स्वॅब तपासणी झाली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.









