प्रतिनिधी/ बेळगाव
लेकव्हय़ू फौंडेशन व रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 5 डिसेंबर रोजी चौथी बेळगाव हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. धावण्यातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे या उद्देशाने हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील 1500 हून अधिक स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतील अशी माहिती लेकक्ह्यू फौंडेशनचे डॉ. एस. वाय. कुलगोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी 6 वा. सीपीएड येथून या मॅरेथॉनची सुरूवात होणार आहे. मॅरेथॉन चार गटांमध्ये होणार आहे. 5 कि. मी., 10 कि. मी., 21 कि. मी., व 3 कि. मी फन रन होणार आहे. 3 लाख रूपयांच्या पारितोषिकांचे वाटप केले जाणार आहे. सीपीएड येथून हनुमान नगर डबल रोड, कॅन्टोन्मेंट, एमएलआयआरसी व जे. एल. वींग या मार्गावर मॅरेथॉन होणार आहे. यामध्ये मुंबई येथील 25 हून अधिक बायपास सर्जरी झालेले रूग्ण सहभागी होणार आहे. यावेळी संतोष शानभाग, मयुरा शिवलकर, सुषमा भट उपस्थित राहतील अशी माहिती रोटरी क्लब ऑन वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी यांनी दिली. यावेळी मुंबई येथील यू टू कॅन रनचे व्यंकटरामन, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे सेपेटरी विनय बाळीकाई व डॉ. सोनवलकर उपस्थित होते.









