केएससीए धारवाड झोन फर्स्ट डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय केएससीए धारवाड झोन फर्स्ट डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाने आनंद क्रिकेट अकादमीचा 42 धावाने पराभव करून 4 गुण मिळविले. अमित यादव व तनिष्क नाईक यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले.
ऑटोनगर येथील केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाने 50 षटकात सर्व बाद 265 धावा केल्या. त्यात अमित यादवने 2 षटकार, 4 चौकारासह 58, अमेय अडकुरकरने 40, तनिष्क नाईकने 1 षटकार, 3 चौकारासह 34, सुजय सातेरीने 30, आकाश असलकरने 28, वेंकटेश शिराळकरने 26, केदार ऊसुलकरने 23 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे प्रणय गोखलेने 34 धावात 3, आनंद कुंभारने 29 धावात 2 तर आर्यन उपाध्ये, किसन मेघराज, नितीन एस. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद क्रिकेट अकादमीचा डाव 41.1 षटकात सर्व बाद 223 धावात आटोपला. त्यात किसन मेघराजने 30, साहिल पारीश्वाडने 29, नितीन एस.ने 24, आनंद कुंभारने 27, प्रणय गोखलेने 25, आर्यन गवळीने 14, आदित्य कलपत्रीने 12 तर देवांग देवाडिगाने 10 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे तनिष्क नाईकने 29 धावात 3, अमित यादवने 33 धावात 3, आकाश असलकरने 56 धावात 3 तर विराज अवलेकरने 1 गडी बाद केला.









