बेंगळूर/प्रतिनिधी
कॉंग्रेस पक्षाचे नेते लखन जारकिहोळी यांनी त्यांचा भाऊ सतीश जारकिहोळी यांच्याविरोधात बेळगावतील आगामी लोकसभा पोटनिवडणुकीत प्रचार करण्याचे मान्य केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जगदीश शेट्टर, बेरथी बसवराज, उमेश कत्ती, अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते यांनी लखन यांना पक्षात येण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट देत विनंती केली. सध्या भाजपचे दोन्ही आमदार रमेश आणि भलंचंद्र यांचा त्यांनी सल्ला घेतल्यानंतर पक्षात प्रवेश करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे लखन यांनी सांगितले.
भाजप नेत्यांनी केलेल्या विनंत्या लक्षात घेऊन मी मंगला अंगडी (बेळगाव येथील भाजपा उमेदवार) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मला पक्षात येण्याचे आवाहनही केले आहे, असे लखन यांनी आपल्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. १७ एप्रिलच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपचे उमेदवार मंगला अंगडी आणि त्यांची मुलगी लखन यांच्या निवासस्थानी गेली.