सोमवार, शुक्रवार, शनिवार असे तीन दिवस सेवा
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याने बंद करण्यात आलेली बेळगाव-नाशिक विमानसेवा आता पुन्हा एकदा पूर्ववत होणार आहे. दोन जुलैपासून नाशिक शहराची विमानसेवा पूर्ववत होणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.
जानेवारी महिन्यापासून स्टार एअरने बेळगाव-नाशिक विमानसेवा सुरू करण्यात आली होती. परंतु काही महिन्यातच महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. यामुळे प्रवासी संख्याही घटल्याने विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती. आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी झाली असून, प्रवाशांमधून मागणी होत असल्याने बेळगाव-नाशिक विमानसेवा पूर्ववत केली जाणार आहे. सोमवार, शुक्रवार व शनिवार असे आठवडय़ातून तीन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार असल्याची माहिती स्टार एअरकडून देण्यात आली.









