मंगळवारी आणखी चार रुग्णांची भर
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. जिह्यामध्ये मंगळवारी पुन्हा चार जण आढळले आहेत. हे सर्व बाधित अथणी तालुक्मयातील आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या व्यक्तींनाच कोरोनाची बाधा होत असल्याचे आरोग्य खाते सांगत आहे. आता जिह्याचा आकडा 397 वर पोहोचला असून 8 जणांचा आतापर्यंत कोरानामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोना आजाराने संपूर्ण देशातच हाहाकार माजविला आहे. सोमवारी जिह्यामध्ये तब्बल 16 जण कोरोना बाधित आढळले होते. तर दोन महिलांचा देखील मृत्यू झाला होता. यामुळे जनतेमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. किती जणांना कोरोनाची बाध झाली, याकडेच साऱयांचे लक्ष लागून आहे. आता मृत्यू होण्याच्या संख्येमध्येही वाढ होवू लागली आहे. त्यामुळे आणखीनच भितीचे वातावरण पसरु लागले आहे.
आता सर्वसामान्य जनतेबरोबर डॉक्टर्स आणि परिचारीकांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे डॉक्टरांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. कोण्णूर (ता. गोकाक) येथील 55 वषीय महिलेचा मृत्यू सोमवारी झाला. याचबरोबर दररु (ता. अथणी) येथील 60 वषीय वृध्देचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटना सारीने झाल्याचे डाक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता हवेतूनही कोरोनाची बाधा होत असल्याचा संशय व्यक्त होवू लागला आहे.
या वाढत्या आकडय़ामुळे साऱयांच्याच मनामध्ये धडकी भरली आहे. मंगळवारी चार जण अथणी तालुक्मयातील असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यामध्येही बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत चालली आहे. मंगळवारी राज्यात 1482 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाने 15 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. मागील 15 दिवसांच्या तुलनेत कोरोनाचा आकडा वाढतच चालला आहे.









