कोरोना रुग्णसंख्येने गाठला पाच हजाराचा टप्पा : 12 जण दगावले : डॉक्टर-वैद्यकीय कर्मचाऱयांना लागण
प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी बेळगाव जिल्हय़ाने कोरोनाबाधितांची पाच हजाराची संख्या पार केली आहे. दिवसभरात 270 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामुळे जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 5 हजार 174 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनामुळे बारा जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी बेळगाव तालुक्यातील 119 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बेळगाव शहर व परिसरातील 107 व ग्रामीण भागातील 12 जणांचा समावेश आहे. बेळगाव परिसरात कोरोना बळींची संख्या वाढतीच असून दगावलेल्या 12 जणांमध्ये 8 जण एका बेळगाव शहर व परिसरातील आहेत.
डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांना कोरोनाची लागण सुरूच आहे. शनिवारी बिम्समधील चौघे जण, होनगा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक, खासगी इस्पितळातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर एकूण तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
पंतबाळेकुंद्री, पिरनवाडी, कंग्राळी बी. के., क्रांतीनगर गणेशपूर, मारिहाळ, हिरेबागेवाडी, शिंदोळी, नेहरूनगर, अमननगर, शास्त्राrनगर, जुनेबेळगाव, खडेबाजार, सोमवारपेठ टिळकवाडी, वैभवनगर, मुजावर गल्ली, ओमनगर, शहापूर, आंबेडकरनगर, उज्ज्वलनगर, न्यू गुड्सशेड रोड, हिंडलगा, आंबेवाडी, चव्हाट गल्ली, वाघवडे परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
पाटील मळा, द्वारकानगर चौगुलेवाडी, बॉक्साईट रोड, गांधीनगर, राणी चन्नम्मानगर, नानावाडी, वीरभद्रनगर, फुलबाग गल्ली, बेन्नाळी, महांतेशनगर, भाग्यनगर, सदाशिवनगर, विनायकनगर, हनुमाननगर वडगाव, खासबाग, शहापूर परिसरातील वेगवेगळय़ा गल्ल्यांमधून कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. टीव्ही सेंटर, बसव कॉलनी, भडकल गल्ली, कणबर्गी, मोदगा, हिंदवाडी, धामणे, जाफरवाडी, अयोध्यानगर (कोल्हापूर कत्रीजवळ), रामतीर्थनगर परिसरातील अनेकांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाला आणखी 328 अहवालांची प्रतीक्षा आहे. स्वॅब तपासणीपेक्षा आता रॅपिड टेस्टिंग किटच्या माध्यमातून तपासणी वाढविण्यात आली असून जिल्हय़ातील 8 हजार 853 जण चौदा दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. लक्षणे दिसून आल्यास त्यांचीही स्वॅब तपासणी होणार आहे.
45 हजार जणांची तपासणी पूर्ण
जिल्हय़ात आतापर्यंत आरोग्य विभागाने 45 हजार 153 जणांची स्वॅब तपासणी पूर्ण केली आहे. यापैकी 38 हजार 862 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शनिवारी एकूण बाधितांची संख्या 5 हजार 174 वर पोहोचली असून 1649 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 3 हजार 431 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
रुग्ण दगावण्याच्या प्रमाणात वाढ
बेळगाव शहर व उपनगरात कोरोनाबाधित व संशयितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बेळगाव शहर, हिरेबागेवाडी, कणबर्गी येथील आठ जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. तर बैलहोंगल, खानापूर, संकेश्वर, कणगला, निपाणी परिसरातील एकूण 13 जण कोरोनामुळे दगावले आहेत. केवळ बेळगाव शहर व उपनगरच नव्हे तर ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झपाटय़ाने वाढतो आहे.