पुन्हा जिल्हा पंचायत अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक 6 मध्ये राहत आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याच सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत. उलट गटारी अडविणे, रस्ते बंद करणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी क्रांतीनगर नागरिक संघटनेच्यावतीने जिल्हा पंचायत अधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतमधील वॉर्ड क्रमांक 6 येथे रस्ते-गटारी अडविण्याचा प्रकार सुरू असून काही जण दमदाटी करत आहेत. आम्ही जागा खरेदी करून रितसर ग्राम पंचायतीमध्ये नोंद करून घरे बांधली आहेत. असे असताना गटारी अडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. तेव्हा तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
गणेशपूर, क्रांतीनगर येथे असलेल्या या वॉर्डमध्ये काही जण दमदाटी करत आहेत. तेव्हा येथील सोयीसुविधा ग्राम पंचायतीने उपलब्ध कराव्यात, तसेच जे रस्ते अडवत आहेत, गटारी बुजवत आहेत व पाणीदेखील अडविण्यात येत आहे. त्यामुळे समस्या निर्माण होत असून तातडीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱयांना निवेदन देण्यासाठी मंदा नेवगी, एम. एन. चव्हाण, एस. एम. कागवाड, टी. एम. पाटील, शिल्पा देवेकर, जया कागवाड यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.









