प्रतिनिधी/ बेळगाव
बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतमधील वॉर्ड क्रमांक 4 ज्योतीनगर यामधून सागर सुंदर लाखे, संदीप शिवाजी डावाळे, लक्ष्मी राजू शिंदे हे विजयी झाले तर वॉर्ड क्रमांक 5 मधून पप्पू गंगाराम भोसले, अंजना यल्लाप्पा नाईक हे विजयी झाले. गुरूवारी या सर्वांनी तरुण भारतला भेट दिली. यावेळी आम्ही गावच्या विकासासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी दिले.









