बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्ण वाढीचे सत्र सुरुच आहे. त्याचबरोबर राजधानी बेंगळूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी बेंगळूरमध्ये कोरोनाने उच्चांक गाठला. जिल्ह्यात कोरोनाचे ५ हजाराहून अधिक रुग्ण सापडले.
बेंगळूरमध्ये कोरोनाने मंगळवारी नवीन विक्रम नोंदविला. शहरात एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे ५,०१२ कोरोना बाधित रुग्णांची भर पडलेली पहायला मिळाली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिवसेंदिवस प्रशासनाची चिंता वाढत आहे. जिल्ह्यात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ५५,७३६ वर पोहचली आहे. कोरोना संसर्गामुळे बेंगळूरमध्ये आतापर्यंत ३,१३५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.









