बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमध्ये हिंसाचार प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेत आहे. त्यांची चौकशी देखील पोलीस करत आहेत. असे असताना आठवड्यानंतर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (सीसीबी) हिंसाचाराच्या संदर्भात मंगळवारी एका माजी महापौरांसह दोन बीबीएमपी नगरसेवकांची चौकशी केली. माजी महापौर व नगरसेवक आर संपत राज आणि अब्दुल रकीब झाकीर यांची सीसीबी मुख्यालयात पाच तासांहून अधिक वेळ चौकशी केली गेली.
राज हे देवरा जीवन हळ्ळी (डीजे हळ्ळी) प्रभागचे नगरसेवक आहेत, तर झाकीर बेंगळूरच्या पुलकेशिनगर प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात.
मंगळवारी सकाळी १०.२० च्या सुमारास सीसीबीच्या मुख्यालयात राज आणि झाकीर यांना बोलावून सायंकाळी ०४. ३० च्या सुमारास सोडण्यात आले. चौकशीनंतर दोन्ही नगरसेवकांनी पत्रकारांना त्यांनी पोलिसांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि दंगलींशी त्यांचा काही संबंध नाही, से सांगितले.