बेंगळूर/प्रतिनिधी
दिल्लीत रेल्वे मार्गावर असणाऱ्या झोपडपट्ट्या पाडण्याचा आदेश सुप्रीम कोर्टने दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाचा निषेध करत कर्नाटक झोपडपट्टी संघटनेच्या समन्वय समितीने, इतर सामाजिक संघटना आणि नागरिकांनी मिळून बेंगळूरमधील मौर्य सर्कल येथे धरणे आंदोलन केले. या सर्व संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. झोपडपट्ट्या पडल्यास आम्ही जायचे कुठे असा सवाल येथे राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे.









