बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर ट्रॅफिक पोलिसांनी गेल्या आठवड्यात शहरातील वाहतुकीचे नियम न पाळल्याबद्दल तसेच नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांकडून ३,६३,०७,३०० रुपये दंड जमा केला आहे.
ट्रॅफिक सह पोलिस आयुक्त बी. आर. रविकांत गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार हा दंड १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांनी वसूल केला आहे.
हेल्मेट न घातल्याबद्दल दुचाकीस्वारांकडून दंड म्हणून १.०२ कोटी रुपये वसूल करण्यात आले, तर मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट न घातल्याबद्दल ६२.३८ लाख दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, सुमारे १०,०७७ लोक वाहतुक सिग्नल मोडताना पकडले गेले. एकाच वेळी ८१ वेगवेगळ्या प्रकरणी एकूण ८६,३८० प्रकरणे दाखल केली गेली आहेत.









