बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा गुरुवारी बेंगळुरू मिशन २०२२ लाँच करीत राजधानीसाठी अनेक विकास प्रकल्पांची घोषणा करतील.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक नकाशा बनविण्यात आला असून शहराचे सौंदर्यीकरण व विकास करण्यासाठी तज्ञांच्या शिफारशींचा वापर करून अधिकाधिक मोकळी जागा, नवीन नाले, शासकीय कार्यालयांसाठी जुळे टॉवर्स बांधणे, आणि रस्ते आणि रहदारी प्रकल्पांशी संबंधित इतर घोषणा करण्यात येणार आहे.
बेंगळूरमध्ये होणाऱ्या स्थानिक नागरी निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून सत्ताधारी भाजपा सरकारच्या या घोषणांनाही महत्त्व दिले जाते.









