बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगपालिकेच्या (बीबीएमपी) मार्शल आणि आरोग्य निरीक्षकांप्रमाणेच आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांवर पोलीस दंड आकारणार आहेत. बीबीएमपी सर्व पोलीस ठाण्यांना हँडहेल्ड मशीन्स देणारा आहे. या दंडाची रक्कम एक हजार रुपयांपर्यंत असू शकते. सध्या मास्क न घातल्याबद्दल नियम मोडणाऱ्या व्यक्तीला २०० रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.
दरम्यान आता बीबीएमपीने एक हजार रुपये दंड करण्याची शिफारस केली आहे. वास्तविक पाहता, मे महिन्यात जेव्हा मास्क अनिवार्य करण्यात आला तेव्हा मास्क न घालता फिरणाऱ्या व्यक्तीला प्रथमच पकडलेल्यास एक हजार रुपये दंड आणि दुसऱ्यांदा दोन हजार रुपये दंड करण्याची तरतूद होती. परंतु लोकांच्या रोषामुळे तो दंड २०० रुपये केला. मंजुनाथ प्रसाद यांनी विविध नागरी गट आणि निवासी कल्याणकारी संघटनांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चर्चा केली आणि सर्वांना सुरक्षा नियमांची टेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांची मदत आवश्यक असल्याचे सांगितले.
दरम्यान विशेष आयुक्त डी. रणदीप यांनी सोमवारपासून बीबीएमपी क्षेत्रातील १०९ पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक उपकरण उपलब्ध असेल. नगरसेवकांच्या अनुपस्थितीत रहिवाशांशी नियमितपणे बैठक घेवून समस्या सोडवणे ही नोडल अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे असे सांगितले.