बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगर पालीकेचे (बीबीएमपी) प्रशासक गौरव गुप्ता आणि आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी बीबीएमपीच्या मुख्य कार्यालयात ७१ वा संविधान दिन साजरा केला.
संविधान दिनानिमित्त बीबीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॉ. बी. आर. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
संविधान दिन हा दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्याबद्दल साजरा केला जातो. १९४९ च्या या दिवशी, भारतीय संविधान समितीने भारतीय राज्यघटना स्वीकारली आणि ती २६ जानेवारी, १९५० रोजी अंमलात आली.









