वृत्तसंस्था/ हैदराबाद
येथील गच्चीबोली इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या प्राईम लीग व्हॉलीबॉल स्पर्धेत सोमवारी बेंगळूर टॉरपेडोज आणि कालिकत हिरोज यांच्यात अकरावा सामना खेळविला जाणार आहे.
हा सामना शेवटपर्यंत चुरशीचा होईल, अशी आशा आहे. यापूर्वी कालिकत हिरोजने पहिल्या दोन सामन्यात बेंगळूर टॉरपेडोजचा पराभव केला होता. या कामगिरीमुळे कालिकत हिरोजचा संघ सोमवारच्या सामन्यात अधिक आत्मविश्वासने खेळ करेल. रूपे पुरस्कृत प्राईम व्हॉलीबॉल लीग स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत असून ही दर्जेदार स्पर्धा म्हणून ओळखली जाते.









