बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी उपनगरीय रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेतला. तपासणी दरम्यान मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री आर. अशोक यांनी अधिकाऱ्यांकडनून बैप्पनळ्ळी-होसूर आणि यशवंतपूर-चन्नसंद्र मार्गावरील सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यांनतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बेंगळूर उपनगरीय रेल्वे प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक स्वप्न प्रकल्प आहे आणि ते स्वतः प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. मंत्री व अधिकाऱ्यांसमवेत रेल्वे मार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. उपनगरी रेल्वे आंतरराष्ट्रीय विमानतळासह उपनगरी भागांना जोडणे सुलभ करेल. यामुळे वाहतुकीचे प्रमाण कमी होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.