बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात रेमडेसिवीरच्या चोरीचे प्रकार सुरूच आहे. बेंगळूरमधील रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) शहरातील विभागीय रेल्वे रूग्णालयात काम करणाऱ्या चार रेल्वे कर्मचार्यांना अटक केल्याची माहिती दिली आहे.
आरपीएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेमडेसिवीर चोरी प्रकरणात अटक केलेल्या आरोपींमध्ये एक कंत्राटी कामगार आणि तीन गट सी/डी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अटकेनंतर सर्व आरोपींना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दक्षिण पश्चिम रेल्वेने त्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली असल्याची माहिती दिली. तसेच त्यांना निलंबित केले असून त्यांच्याविरूद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई केली गेली आहे.
Previous Articleपुणे : गरजू कलाकार,तंत्रज्ञ यांना किट वाटप
Next Article कोल्हापूर : वितरकांचा दूध विक्री बंदचा निर्णय मागे









