बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते १३ व्या बेंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन २४ मार्च रोजी होईल. या महोत्सवाची सांगता ३१ मार्च रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला अभिनेते श्रुती, तारा, केएफसीसी चे अध्यक्ष डी.आर. जयराज आणि इतर उपस्थित होते.
बीआयएफएफ सहसा वर्षाच्या सुरुवातीस आयोजित केला जातो. परंतु साथीच्या रोगामुळे हा मार्चपर्यंतपुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या वर्षी, याची सुरुवात २७ फेब्रुवारी रोजी झाली. यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात हा कार्यक्रम होणार आहे. मल्टिप्लेक्समध्ये ११ स्क्रीनवर चित्रपट प्रदर्शित केले जातील. कर्नाटक चलचित्र अकादमी सेमिनार आयोजित करण्याची योजना आखत असून, सत्यजित रे यांचे निवडक चित्रपट महोत्सवात दाखवले जातील. एस पी बालसुब्रह्मण्यम आणि पंडित भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली वाहिली जाईल. चित्रपट आशियाई, भारतीय आणि कन्नड प्रकारात प्रदर्शित केले जातील.
या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय फिल्म फेडरेशन असोसिएशन कडून आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटक चलचित्र अकादमीचे अध्यक्शननी गेल्या वर्षी बीआयएफएफच्या उद्घाटन कार्यक्रमात भाग घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय महासंघाच्या फिल्म प्रोड्यूसर असोसिएशनचे शिष्टमंडळ आमच्या व्यवस्थेमुळे प्रभावित झाले आणि ते लवकरच या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्याचे विचारात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.