ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. बॅडमिंटनमध्ये भारताला परदेशात विजेतेपद मिळवून देणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते.
सांगली येथे 12 मे 1933 रोजी नाटेकर यांचा जन्म झाला. 1956 मध्ये क्वालालंपूर येथील सेलांगोर इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून त्यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. त्यांच्या बॅडमिंटनमधील 15 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी 100 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदे पटकावली. तसेच त्यांनी प्रत्येकी सहावेळा पुरुष एकेरी आणि दुहेरीचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते.









