नवी दिल्ली
स्थानिक स्तरावर म्हणजेच भारतात बॅटरी निर्मितीला प्रोत्साहन मिळवून देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला असून याअंतर्गत पीएलआय योजनेतून 18 हजार कोटींच्या सवलतीचा लाभ उत्पादकांना मिळणार असल्याचे समजते. केंद्रीय मंत्रीमंडळाने सदरच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. बॅटरीच्या आयातीवरचा भार कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. इलेक्ट्रीक वाहनांकरीता लागणाऱया बॅटरीसाठी सध्या विदेशावर अवलंबून राहावे लागते आहे. हे पाहूनच भारतातच मेक इन इंडियाअंतर्गत बॅटरी उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. याअंतर्गत 45 हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे संकेतही केंद्राने व्यक्त केले आहेत.









