140 नवे रुग्ण तर चौघा जणांचा मृत्यू
प्रतिनिधी /बेळगाव
बुधवारी बेळगाव जिल्हय़ात कोरोनाचे 140 नवे रुग्ण आढळले आहेत. 73 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठविले आहे. बेळगाव, अथणी, चिकोडी तालुक्मयातील चौघांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव व चिकोडी तालुक्मयात रुग्णसंख्या वाढतीच आहे.
अथणी येथील एका 65 वषीय वृद्धाचा तर बेळगाव तालुक्मयातील 49 वषीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. चिकोडी तालुक्मयातील 70 वषीय वृद्धा व 35 वषीय महिलाही कोरोनामुळे दगावली आहे. बुधवारी बेळगाव तालुक्मयात 39 तर चिकोडी तालुक्मयात 52 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
अद्याप 2 हजार 683 जणांचे अहवाल यायचे आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांचा आकडा 77,221 वर पोहोचला असून त्यापैकी 74 हजार 318 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मृतांचा सरकारी आकडा 833 वर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णसंख्या अद्याप 2 हजार 70 इतकी आहे.
सांबरा एटीएसमधील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पिरनवाडी, गणेशपूर, काकती, आझमनगर, गोंधळी गल्ली, माळमारुती, नेहरुनगर, शाहूनगर, शिवबसवनगर परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अद्याप जिल्हय़ात 47 हजार 507 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
10 लाखांहून अधिकांची तपासणी
आतापर्यंत जिल्हय़ातील 10 लाख 3 हजार 770 हून अधिक जणांची स्वॅब तपासणी केली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. यापैकी 9 लाख 19 हजार 554 जणांचे अहवाल निगेटिक्ह आले आहेत.









