प्रतिनिधी/ बेळगाव
राज्याचे उच्चशिक्षण मंत्री के. सुधाकर यांनी बुद्धांबद्दल जे वक्तव्य केले, त्या विरोधात बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन निषेध नोंदविला आहे.
बुद्धांबद्दल काहीच माहिती नसताना अशाप्रकारचे वक्तव्य करून त्यांनी दलितांच्या भावना दुखावल्या आहेत. बुद्धांनी दिलेली शिकवण जगाला आदर्शवत आहे. असे असताना त्यांचा अवमान केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी यल्लाप्पा कांबळे, शेखर शिंगी, यमन्नाप्पा गडीनाईक यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते..









