पॅन इंडियाची नावाजलेली अभिनेत्री पूजा हेगडे स्वतःच्या अभिनयासह ग्लॅमरस लुकसाठी नेहमी चर्चेत असते. पूजा हेगडे लवकरच थलापति विजयसोबत ‘बीस्ट’ चित्रपटात दिसून येणार आहे. पूजा अलिकडेच या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी चेन्नईत पोहोचली आहे.
1 जुलैपासून चेन्नईच्या गोकुळम स्टुडिओत याचे चित्रिकरण सुरू झाले आहे. विजयच्या ‘बीस्ट’चे नेल्सन दिलीपकुमार हे दिग्दर्शन करत आहेत. चेन्नईतील हे चित्रिकरण 20 दिवसांपर्यंत चालणार आहे.
विजय आणि पूजा हेगडेच्या ‘बीस्ट’चे पहिले चित्रिकरण सत्र युरोपच्या जॉर्जियामध्ये पार पडले आहे. दुसऱया सत्रात नृत्याचे चित्रिकरण होणार असून याचे नृत्यदिग्दर्शन जानी मास्टर करणार आहत.
मागील आठवडय़ातच पूजाने प्रभाससोबतच्या ‘राधे-श्याम’ चित्रपटाचे चित्रिकरण हैदराबादमध्ये पूर्ण केले आहे. बीस्ट चित्रपट सन पिक्चर्सद्वारे तयार केला जात आहे. या चित्रपटात विजय आणि पूजा यांच्यासह शाइन टॉम चाको, अपर्णा दास आणि योगी बाबू मुख्य भूमिकेत आहेत.









