प्रतिनिधी/ बेळगाव
बी. व्ही. बेल्लद लॉ कॉलेजमध्ये संविधानदिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ये÷ न्यायाधीश विजय देवराज अर्स उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, संविधान म्हणजे केवळ राजकीय दस्तऐवज नाही तर देशाचा पवित्र असा दस्तऐवज आहे. संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञ राहणे हे आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांनी कायदा शाखेची निवड करुन उत्तम वकील व्हावे व लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी केली.
प्राचार्य बी. जयसिंह यांनी संविधान आपल्याला हक्कांची माहिती करुन देते तर कर्तव्याची जाणिव करुन देते. सरकार आणि नागरिक यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणजे सुविधान होय, असे ते म्हणाले. यावेळी पूजा अजुरे या विद्यार्थिनीनेही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. श्रीनिवास पलाकोंडा यांनी स्वागत केले. महालक्ष्मी गंबार यांनी स्वागतगीत सादर केले. डॉ. सुप्रिया स्वामी यांनी आभार मानले. गीता रोट्टी यांनी सुत्रसंचालन केले.









