ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये दिवसभरात 31 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 62 हजार 628 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून 50 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर बिहारमधील एकूण 2,62,628 रुग्णांपैकी आता पर्यंत 2 लाख 60 हजार 737 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 99.28 % आहे. तर आतापर्यंत 1,542 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 2 कोटी 25 लाख 25 हजार 216 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 348 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.