- अटीनुसार इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे भरणार वर्ग
ऑनलाईन टीम / पाटणा :
काही अटींसह बिहारमधील सरकारी आणि खाजगी शाळा 8 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय बिहारचे मुख्य सचिव दीपक कुमार यांनी झालेल्या बैठकीत घेतला.
8 फेब्रुवारीपासून शाळा सुरू होणार असल्या तरी सर्वांना काही अटींचे पालन करणे आवश्यक असणार आहे. यानुसार, एका दिवशी शाळेत केवळ 50 % विद्यार्थी येण्यास परवानगी असणार आहे. तर उरलेले 50% विद्यार्थी दुसऱ्या दिवशी येतील. असे असले तरी शिक्षकांना मात्र, दररोज शाळेत यावे लागणार आहे.यासोबतच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शाळा कधी सुरू केली जाईल याबाबत अजूनही निर्णय झाला नसून लवकरच याबाबत माहिती दिली जाणार आहे.









