ग्रामपंचायतीना दक्षता घेण्याची सुचना
वारणानगर / प्रतिनिधी
गिरोलीसह सादळे, मादळे परिसरात बिबट्यासह वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने या गांवाना परिमंडळ वनअधिकारी पन्हाळा यांचे कार्यालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पन्हाळा वनपरिमंडळाच्या आखत्यारीत मौजे मौजे गिरोली,सादळे,मादळे या भागात बिबट्या या वन्यप्राण्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले असून सदर वन्यप्राणी बिबट्यापासून मनुष्यहानी, पशु हानी होऊ नये यासाठी आपले ग्रामपंचयतीकडून गावात दक्षता घेणेबाबत कळविणेत यावे. तसेच लहान मुले, शेळी, कुत्रे, व इतर पाळीव प्राणी यांची दक्षता घेणेबाबत कळविणेत यावे असे या तिन्ही गावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांना लेखी सूचना वन विभागाने दिल्या आहेत.
सदरचा बिबट्या कोणाच्या निदर्शनास आल्यास त्याला दगड मारणे,किंवा काठीणे हुसकावणे, तसेच त्याला चिड येईल असे कोणतेही वर्तन करु नये. शेतात जाताना एकट्याने जाऊ नये ग्रुप ने जावे. तसेच बिबट्या दिसल्यास पन्हाळा वनपाल व्ही. टी. दाते , एन.एस.पाटील, मो.न.९७६५७७२८१० व नरक्षक , राक्षी ए.बी.माने मो.न.९६३७२६१५२५ या क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाने केले आहे.
Previous Articleसांगली जिल्ह्यात नवे 314, तर कोरोनामुक्त 529
Next Article बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे 184 नवे रुग्ण









