वार्ताहर / कुंभोज
सत्य अहिंसा परमो धर्म या विचारावर आधारित असणारा जैन धर्म व जैन धर्माच्या व जैन मुनींच्या आचार व विचाराने पुनीत झालेली बाहुबली नगरी, बाहुबली विद्यापीठातून आज हजारो विद्यार्थी पुस्तकी शिक्षणाबरोबरच लौकिक शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत आज देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच विदेशात ही पाऊल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. परिणामी संपूर्ण देशाच्या जडणघडणीत बाहुबली विद्यापीठाचे कार्य उल्लेखनीय आहे असे गौरवोद्गार माझी मुख्यसचिव व दिल्ली लोकपाल आयोगाचे सदस्य डी के यांनी काढले.
ते बाहुबली ता हातकणंगले येथे बाहुबली विद्यापीठ बाहुबली येथे भगवान महावीर यांच्या मूर्ती दर्शन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी त्यांचा सत्कार बाहुबली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील बाहुबली विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे, बालविकास मंदिराचे चेअरमन तात्यासाहेब अथने, कुंभोज महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष अजित गोपूडगे, नेमिनाथ बाळीकाई, समीर भोकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संपूर्ण बाहुबली विद्यापीठ व तीर्थक्षेत्राची तसेच परमपूज्य समंतभद्र महाराज यांच्या जीवन चरित्रची माहिती नेमिनाथ शास्त्री यांनी प्रमुख पाहुण्यांना दिली.









