व्हीटीयू बेळगाव झोन बास्केटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
जीआयटी महाविद्यालय आयोजित व्हीटीयू बेळगाव झोन बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जीआयटी महाविद्यालयाने केएलई आयटी हुबळी संघाचा 61-22 असा पराभव करून सलग पाच वर्षे स्पर्धेचे अजिंक्मयपद
पटकाविले.
जीआयटी महाविद्यालयाच्या बास्केटबॉल मैदानावर आयोजित करण्यात आलेले व्हीटीयू बेळगाव झोन बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन जीआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य जयंत कित्तूर यांनी चेंडू बास्केटमध्ये टाकून केले. बेळगाव झोनच्या या बास्केटबॉल स्पर्धेत 5 अभियांत्रिकी महाविद्यालयानी भाग घेतला होता. उपांत्य सामन्यात केएलएस जीआयटी संघाने जैन अभियांत्रिकी महाविद्यालय संघाचा 47-17 अशा पराभव
केला.
तर केएलई आयटी हुबळी संघाने एसजीबीआयटी संघाचा 30-18 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात केएलएस जीआयटी संघाने केएलई आयटी हुबळी संघाचा 61-22 असा पराभव करून सलग पाचव्यांदा स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकाविले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे केएलएस जीआयटी महाविद्यालयाचे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन एम. आर. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. जयंत कित्तूर, जिमखाना चेअरमन डीन. डॉ. रमेश मेदार, प्रा. सतिश देशपांडे, क्रीडा प्राध्यापक डॉ. पी. व्ही. कडगदकाई, साहाय्यक क्रीडा प्राध्यापक क्रांती कुरणकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या केएलएस जीआयटी व उपविजेत्या केएलई आयटी हुबळी संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून व्ही. एस. पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जीआयटीच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.









