प्रतिनिधी / सातारा :
दिवाळी सण काही दिवसांवर आला असून बालचमूं किल्ला बनवण्यासाठी व्यस्तआहेत. दरवर्षी दिवाळीच्या सुटीची प्रतीक्षाकरावी लागत होती. मात्र, यंदा कोरोनामुळेमुले घरात असून, दिवाळीची चाहूललागल्याने बालगोपाळांची किल्लेबनविण्यासाठीची लगबग दिसून येत आहे.
दिवाळी सणाला बच्चे कंपनीघराशेजारी, अंगणात, गॅलरीसह सार्वजनिकठिकाणी किल्ला तयार करत असतात. हीपरंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. सध्याची बच्चे कंपनी मोबाईल, टीव्ही यात गुंतूनपडताना दिसत आहेत. मैदानी खेळासह मित्र-मैत्रिणींसोबतचे भातुकलीचे खेळ लोपपावतील का, अशी स्थिती निर्माण होतआहे. यंदा कोरोनामुळे मुले घरात बसूनवैतागली आहेत.
कोरोनाचे प्रमाण कमीझाल्याने दिवाळीच्या निमित्ताने किल्लातयार करण्यासाठी मुले बाहेर पडतानादिसत आहेत. घर व परिसरात माती, विटा,दगड, बारदान आदी उपलब्ध साधनाचीजुळवाजुळव करत आहेत. या लहान वयातमुले कल्पानशक्तीला चालना देतकिल्लेरुपी वास्तू उभी करण्याचा प्रयत्नकरताना दिसत आहेत. त्यामुळे संघटितकार्याशक्ती कामाचे वाटप व नियोजन याचेबाळकडू मिळत आहे.
पालकांनी मुलांना तयार किल्ला आणूनन देता चिखल मातीत हात भरवून किल्लाकरण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलांच्याकौशल्यातून उभारलेल्या किल्ल्याचे कौतुककेल्याने मुलांना ऊर्जा मिळणार आहे. किल्ला तयार होत असताना बाल विचारातून नवनवीन कल्पना कृतीतून साकारल्या जातात.









