बार्शी/ प्रतिनिधी
बार्शी शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या नव्या धोरणाचा प्रसार, प्रचार व अमलबजावणी करण्यासाठी बार्शीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात नगरसेवक, प्रशासन , कर्मचारी यांची बैठक झाली. त्यात बार्शी नगर परिषद विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी बार्शी शहरातील कोरोना बाबत राबवल्या जाणाऱ्या योजना बाबत गंभीर आरोप केले. त्यात बार्शी शहरातील कोरोनामुळे गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल होत आहेत, असे सांगत बार्शी नगर परिषदच्या वतीने मोफत किंवा काही सूट देऊन ऑक्सिजनचे बेड ची व्यवस्था करावी असे सांगितले.
बार्शी पालिकेच्या ताब्यात असलेले जवाहर हॉस्पिटलची इमारत जी मध्यवर्ती भागात आहे आणि सध्या वापरात नाही . ती इमारती मध्ये तात्काळ ऑक्सिबेड चे हॉस्पिटल उभारावे असे सुचवले. यावेळी व्यासपीठावर नगर अध्यक्ष असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, नगरसेवक आदी उपस्थित होते.