तरूण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
बार्शी सोलापूर रोडवर जुन्या कॅनव्हास फॅक्टरी जवळ मोटार कार झाडावर आदळून एक ठार, तीन जखमी झाले आहेत. हा अपघात आज मंगळवार सायंकाळी रोजी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. सदर अपघातस्थळी वैराग पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी पोहोचले असून जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
वैराग हून मोटार कार एम.एच. 13 डी.एम. O473 ही सोलापुर कडे जात असताना सदर कारच्या वाहनचालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या कडेला असणाऱ्या झाडावर जाऊन ही कार आदळल्याचे बोलले जाते. यातील चार प्रवाशांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून बाकी तीन जखमी आहेत. मयत व जखमींची नावे अध्याप कळाली नसून अधिक तपास वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.









