बार्शी / प्रतिनिधी
कोरणा विषाणूचा बार्शी शहरांमध्ये झालेला शिरकाव ही गंभीर बाब असताना आज परत सकाळच्या सत्रामध्ये बार्शी शहरातील सोलापूर रोड या ठिकाणी दोन तर आज सकाळी वैराग या भागांमध्ये एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची भांबेरी उडाली आहे.
आता बार्शी तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 24 झाली असून त्यातील एक मयत आहे. आज सकाळी आलेल्या रिपोर्टनुसार बार्शी शहर येथील सोलापूर रोड येथील बगले बरड या वस्तीमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. तर याच वस्तीमध्ये एक महिला पॉझिटिव्ह आढळली होती तर वैराग येथील पोळ गल्ली या भागांमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे . सध्या कोरोना या रोगापासून मुक्त होणारी संख्याही वाढली असून आतापर्यंत 18 व्यक्ती कोरोना मुक्त होऊन घरी गेलेले आहेत. तर उर्वरित यांच्यावर विविध दवाखान्यात उपचार सुरू आहेत. बार्शी शहरांमध्ये आढळलेले कोरोना रुग्णांपैकी दोन रुग्ण हे बार्शी कोविड सेंटर याठिकाणी दाखल असून एक रुग्ण जगदाळे मामा हॉस्पिटल, एक रुग्ण पुणे येथे खाजगी हॉस्पिटल तर एक रुग्ण सुश्रुत हॉस्पिटल बार्शी याठिकाणी उपचार घेत आहेत. काल नगर परिषदेच्या जगदाळे मामा सभागृहांमध्ये ते झालेल्या बैठकीत कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी विविध पथके तैनात करण्याच्या सूचना आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या होत्या मात्र या सूचना अजूनही अमलात आलेल्या दिसून येत नाहीत. तेव्हा प्रशासनाने, यंत्रणेने बार्शी मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी पुरेपूर दक्षता घेणे गरजेचे आहे तर नागरिकांनीही आता शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








