बार्शी / प्रतिनिधी
बार्शी शहरांमध्ये दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा 27 ते 31 जुलै दरम्यान पाच दिवसाचा कडक लॉकडाऊन आणि संचारबंदी जिल्हा प्रशासनाने घोषित केली आहे. तसेच बार्शी मध्ये रोज वाढणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता विविध यंत्रणा उपाययोजना करण्यामध्ये मग्न आहेत. आता बार्शी शहरातील प्रतिबंधित क्षेत्र आणि इतर शहरभर विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर ड्रोनची नजर असणार आहे.
आज अचानक सुरू केलेल्या ड्रोन कॅमेराच्या पेट्रोलिंगची धास्ती बार्शीच्या नागरिकांनी घेतली असून विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई चालू आहे. याविषयी दैनिक तरुण भारत संवाद अशी बोलताना उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांनी सांगितले की, बार्शी मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार हा वाढत चालला आहे. याचा अटकाव करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित आहेत त्यात बार्शी पोलिसांनी आता ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे विविध प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आणि शहराच्या इतर भागांमध्ये ज्या ठिकाणी पोलिसांचे पेट्रोलिंग कमी प्रमाणामध्ये होतं, अशा ठिकाणी आता ड्रोनचा वापर होणार असल्याचं बार्शी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तरुण भारत संवाद शी बोलताना सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








