बेंगळूर
विविध शहरात आपला व्यवसाय करणाऱया बार्बेक्यु नेशनचा आयपीओ बुधवार 24 मार्चला भारतीय भांडवली बाजारात सादर केला जाणार आहे. या आयपीओत गुंतवणूकदारांना शुक्रवारपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी असणार आहे.
सदरच्या इश्युसाठी कंपनीने समभागाचा दर 498-500 रुपये इतका ठेवला आहे. बेंगळूरची ही कंपनी इश्युमार्फत 180 कोटी रुपयांचे नवे समभाग आणणार आहे. ऑफर फॉर सेलअंतर्गत कंपनी प्रवर्तकांचे 54 लाख समभाग विक्री करणार आहे. बार्बेक्यु नेशनमध्ये सीएक्स पार्टनर्स व दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीही गुंतवणूक केली आहे.









