म्हापसा
बार्देशात दत्तजयंती उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला. कोविडचा काळ असूनही भक्तगणांनी मास्कचा वापर करून देवदर्शन घेणे पसंत केले. यावेळी मोठय़ा संख्येने भक्तगण उपस्थित होते.
आसगाव बार्देश येथे चंदन मांद्रेकर यांच्या अध्यक्षपदाखाली दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला. श्री. व सौ. गावडे यांच्या अध्यक्षपदाखाली दत्तपाळणा सोहळा पार पडला. म्हापसा दत्तवाडी, नरसिंह दत्तात्रय मठ काणका बांध, शिवोली ओशेल दत्तात्रय मंदिर, करासवाडा म्हापसा आदी भोवताल परिसरात दत्तपाळणा, दत्तजयंती उत्सव मोठय़ा उत्साहाने पार पडला. देवस्थान कमिटीतर्फे माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप, सरपंच आसगाव हनुमंत नाईक, समाजसेवक दत्ताराम पेडणेकर, जिल्हा पंचायत सदस्य निहारिका मांद्रेकर आदी मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
1229map15
आसगाव : आसगाव येथील दत्तमंदिरात दत्तजयंती निमित्त दत्तपाळणा सोहळावेळी यजमान श्री व सौ. गावडे, देवस्थान अध्यक्ष चंदन मांद्रेकर आदी.









