ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
समलिंगी असल्याचे सार्वजनिकरित्या स्वीकारणारे माजी मेयर पीट बटइग यांना अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात येणार आहे. बायडेन यांनी परिवहन मंत्रालयासाठी बटइग यांचे नाव सुचविले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांचे मानांकन मान्य केल्यास ते सिनेटचे पहिले LGBTQ कॅबिनेट सदस्य ठरतील.
पीट बटइग हे इंडियानातील होमटाऊन साऊथ बँडमधील विकासकार्यासाठी ते ओळखले जातात. त्यांनी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील नेत्यांना एकत्र आणून साऊथ बँडला इनोव्हेशन आणि नोकऱ्यांचे हब बनवले आहे. युवावर्गासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणे, पर्यावरणसंबंधी आव्हाने पेलण्याची ग्वाही त्यांनी जनतेला दिली आहे.









