ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या तीन माजी अध्यक्षांसह नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन कोरोना लस टोचून घेणार आहेत. त्याचे लाईव्ह प्रक्षेपणही केले जाणार आहे.
ब्रिटनपाठोपाठ अमेरिकेत फायझरच्या लसीला एफडीएची मंजुरी मिळू शकते. तत्पूर्वीलोकांच्या मनातील भीती दूर करण्याच्या उद्देशाने बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश ज्युनिअर कोरोनाची लस टोचून घेणार आहेत. त्यांच्याबरोबर नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरीस या देखील लस टोचून घेणार आहेत. मात्र, ते लसीला एफडीएची मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहेत.
अमेरिकेत मॉडर्ना आणि फायझर या कंपन्यांनी लस प्रभावी असल्याचे जाहीर केले आहे. या लशींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाल्यास डिसेंबरअखेरीस ही लस उपलब्ध होऊ शकते.









