ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
व्हाईट हाऊसमधील नर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेच्या 46 अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्ष पदाची शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेलत्यावर लगेचच जो बायडन यांनी कामाला सुरुवात केली आहे. यासोबतच बायडन यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द देखील पाळला आहे.

बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले काही निर्णय मागे घेतले. तसेच 15 कार्यालयीन आदेशावर स्वाक्षरी देखील केली आहे. यावेळी बायडन यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक निर्णय घेतला आहे.
- बायडन यांनी घेतलेले निर्णय :
- सामान्य लोकांना आर्थिक मदतीची घोषणा
- सर्व नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पाडण्यावर रोख
- वातावरण बदलतील ट्रम्प यांचा निर्णय मागे घेतला.
- वर्मभेद रोखण्याच्या दृष्टीने पाऊल
- सीमेवर भिंत उभारण्याचा निर्णय मागे घेत निधीही रोखण्यात आला आहे.
- ट्रम्प प्रशासनाने घेतलेला म्हणजेच मुस्लिम देशांवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांना दिलेल्या कर्जाचे हप्ते वसूल करण्याच्या निर्णयाला सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.









