नवी दिल्ली
बायजू रविंद्रनचा एज्युटेक स्टार्टअप बायजूसचा सध्या डेकाकॉर्न क्लबमध्ये समावेश करण्यात आला आहे. 10 अब्ज डॉलरचे मूल्य प्राप्त करणाऱया स्टार्टअपला डेकाकॉर्न म्हटले जाते. सिलिकॉन व्हॅलीची गुंतवणूक आणि ऍनालिस्ट मॅरी मीकर्सची गुंतवणूक कंपनी बाँड कॅपिटलने बायजूसमध्ये 10.5 अब्ज डॉलरच्या मूल्याइतकी 79,409 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
बायजूस आता देशातील पेटीएमनंतर दुसरी मोठी स्टार्टअप झाली आहे. पेटीएमचे मूल्य 16 अब्ज डॉलर आहे.
कोचिंग क्लासपासून प्रारंभ
39 वषीय रविंद्रन यांनी 2007 मध्ये कॅटची तयारी करण्यासाठी एक कोचिंग क्लास सुरु केला होता. त्यांनी 2011 मध्ये थिंक ऍण्ड लर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर केली. गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यानंतर 2018 मध्ये बायजूसचे मूल्य 1 अब्ज डॉलर्स झाले.









