दिल्ली/प्रतिनिधी
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलं आहे. हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्यांसाठी नाही तर बाबरी मशीद पुन्हा उभारण्यासाठी आहे. सोमवारी ६ डिसेंबर रोजी रात्री जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेने बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. बाबरी मशिद उभारण्यासाठी हे आंदोलन सुरु आहे. बाबरी मशिदच्या समर्थनार्थ नारेबाजी करण्यात आली तसंच ही मशीद पुन्हा बनवण्याची मागणीही या आंदोलनादरम्यान करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
यासंदर्भात आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, जेएनयूएसयूच्या वतीने ६ डिसेंबरच्या रात्री एक मोर्चा काढण्यात आला. ६ डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. या दरम्यान जेएनयू विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष साकेत मून यांनी तसंच आंदोलनात उपस्थित अन्य डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पुन्हा उभारण्याची मागणी केली.