नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशात कोरोना थैमान घातले असतानाच अॅलोपॅथी उपचारापद्धतीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे योगगुरु रामदेव बाबा चांगलेच वादात सापडले होते. आता बाबा रामदेव यांनी आपण कोरोनाची लस घेणार असल्याचं सांगितलं आहे. सोबतच सर्वांनी कोरोनाची लस घ्यावी असंही आवाहन केलं आहे. त्याचवेळी लोकांनी आयुर्वेद आणि योगाचा अभ्यास करावा असंही त्यांनी सांगितलं आहे.
बाबा रामदेव म्हणाले की, लवकरात लवकर मी लस घेणार आहे. तुम्हीही लस घ्या. आपल्या जीवनात योग आणि आयुर्वेदचा अभ्यास करा. आजारांच्या विरोधात योग ढाल म्हणून काम करते अन् कोरोनापासून होणाऱ्या त्रासापासून वाचवतो. मात्र बिकट आरोग्याच्या परिस्थितीत अॅलोपॉथी ही सर्वश्रेष्ठ उपचार पद्धती आहे. तसेच माझा कुठल्य़ाही आरोग्य संघटनला किंवा उपचारपद्धतीला विरोध नाही. माझी लढाई फक्त औषधं माफियांविरोधात आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच डॉक्टरांवर केलेल्या वादग्रस्त विधानातून युटर्न घेत डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूताप्रमाणे असल्याचे बाबा रामदेव म्हणाले.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये बाबा रामदेव हे अॅलोपॅथिक सायन्स विषयी अवमानजनक भाषा वापरताना दिसत आहेत. अॅलोपॅथी हा प्रकार म्हणजे मुर्खपणा आहे आणि तो दिवाळे काढणारा आहे असं बाबा रामदेव बोलताना दिसत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये त्यांनी अॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही भाष्य केलं आहे. आपल्या विधानावरुन वाद निर्माण झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी आता डॉक्टरांचे कौतुक केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









