ऑनलाईन टीम / मुंबई :
पीएमसी घोटाळय़ातील मुख्य आरोपी राकेश वाधवानशी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचे आर्थिक संबंध आहेत. दोघेही पार्टनर आहेत. त्यामुळे त्यांना पीएमसी घोटाळ्यातील आरोपांखाली अटक करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर आज सकाळी संजय राऊत यांनी यासंदर्भात एक सूचक ट्विट केले आहे.
राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘बाप बेटे जेल मध्ये जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!’
आरोपी राकेश वाधवान आणि सोमय्या पिता-पुत्र व्यवसायात पार्टनर आहेत. निकॉन इंन्फ्रास्ट्रक्चर ही सोमय्या यांची आहे. त्यांचा वसईत प्रकल्प आहे. या प्रकल्पातील घोटाळ्यांची कागदपत्रे आपण आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर काही कारवाई होणार का, हे पाहावे लागेल.








